ताज्या बातम्या

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांना ईडीचं समन्स

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांना ईडीचं समन्स आले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांना ईडीचं समन्स आले आहे. ईडीकडून मुंबई पालिकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगर पालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी चौकशीसाठी संजीव जैस्वाल यांना ईडीनं समन्स बजावलं आहे.

संजील जैस्वाल यांच्याही घरी छापेमारी करण्यात आली होती. ईडीकडून करण्यात आलेल्या छापेमारीत काही रोख रकमा आणि मालमत्तांसंदर्भातील कागदपत्र ईडीच्या हाती लागली आहेत. याच्याआधी त्यांना चौकशीसाठीसुद्धा बोलवण्यात आलं होतं. मात्र काही महत्त्वाच्या कामांत असल्यामुळे संजीव जैस्वाल चौकशीसाठी हजर राहू शकले नाहीत. आता पुन्हा त्यांना ईडीनं समन्स बजावलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Accident : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात अपघात

Weather Update : पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Latest Marathi News Update live : राज्यपाल आचार्य देवव्रत छत्रपती शिवाजी पार्कमध्ये