पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल, गुरुवारी मुंबईत 'जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदे'चे (वेव्हज) उद्घाटन करण्यात आले होते. वेव्हज 2025 हा चार दिवसांचा कार्यक्रम असून आज, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेव्हज परिषदेला भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वेव्हज हा जगातील अतिशय मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला असून त्याचे यजमानदपद महाराष्ट्राला देण्यात आले आहे. आज महाराष्ट्राने वेव्हजच्या दृष्टीनं काही memorandum of understanding (एमओयू) सुरु केले आहेत. एनएसईसोबत एमओयू करत हा इंडेक्स सुरु केला आहे. एकूण ४३ कंपन्यांचा हा इंडेक्स असून गुंतवणूक करण्यासाठी हे मोठं पाऊल आहे. वेव्हजच्या यशातील हा मुकुटमणी आहे.
आज दोन विद्यापीठांसोबत करार करण्यात आला असून नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत परदेशी विद्यापीठांना यात प्रवेश मिळाला. अशात आपण एक एज्युसिटी तयार करत आहोत. जगातील १०० विद्यापीठ आपण आणणार आहोत. या निमित्ताने जवळपास १२००-१५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तर ४ विद्यापीठांसोबत चर्चा सुरु आहे आणि आणखी ५ विद्यापीठ येणार आहेत.