Eknath Khadase  Team Lokshahi
ताज्या बातम्या

"केंद्राने मध्यप्रदेशला दिलेला इम्पेरिकल डाटा महाराष्ट्राला पुरवला असता तर..."

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Published by : Sudhir Kakde

ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्दयावरुन एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे ओबीसी आरक्षण लागू होण्यास महाराष्ट्रात विलंब झाला असून, केंद्र सरकारने इम्पेरीकल डाटा (Imperical Data) मध्यप्रदेश सरकारला पुरवला तोच डाटा महाराष्ट्र सरकारला पुरवला असता तर लवकर कारवाई झाली असती असं खडसे म्हणाले आहेत. ओबीसी आरक्षणाबाबत घेतलेला निर्णय हा ओबीसींवर अन्याय करणारा असून, याबाबत न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्यावरच पुढे काय होईल ते पाहावे लागेल अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

भाजपने मात्र या मुद्द्यासाठी महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरलं आहे. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) बाबतीत जे मध्यप्रदेश सरकारला जमलं ते महाराष्ट्र सरकारला जमलं नाही अशी टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी केली होती. "आज मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) ओबीसींना त्यांचे हक्क मिळाले आहेत. त्यांचे अभिनंदन करायला हवे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाज त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित राहिला याची खंत वाटते. महाविकास आघाडीचे (MVA Government) सरकार या बाबतीत गेंड्याच्या कातडीचे आहे अशी टीका राज्याचे माजी मंत्री, ओबीसी नेते आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद