Gunratna Sadawarte Team Lokshahi
ताज्या बातम्या

"ST कर्मचाऱ्यांनी कष्टानं कमवलेला पैसा दिला अन् सदावर्तेंनी विश्वासघात केला"

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी गुणरत्न सदावर्तेंवर टीका केली आहे.

Published by : Sudhir Kakde

गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी एसटी कर्मचाऱ्यांची (ST Workers) फसवणूक करुन 144 कोटी रुपये जमवले असं म्हणत खडसेंनी (Eknath Khadase) सदावर्तेंवर टीका केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केली. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या कष्टाने, श्रमाने कमावलेला एक एक रुपया जमा करून त्यांना दिला. त्या एसटी कर्मचाऱ्यांचा सदावर्ते यांनी विश्वास घात केला असं एकनाथ खडसे म्हणाले.

राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सदावर्तेंवर गुन्हे दाखल होत आहेत त्यामुळे सदावर्ते यांची पोलिसांच्या माध्यमातून तीर्थयात्रा होतेय असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूर न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्तेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणात माध्यमांशी बोलत असताना केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर साताऱ्यातील फलटन, कोल्हापुरातील शाहुपूरी पोलीस ठाणे आणि पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?