लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.
एकनाथ खडसे यांनी चोपडामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की, प्रचारामध्ये काही ठिकाणी आदिवासी क्षेत्रामध्ये बैठका घेत आहे.
प्रदेशाध्यक्षांनी मला सांगितलेलं आहे की, काही आदिवासी क्षेत्रापर्यंत आणि दलित वस्तीपर्यंत तुम्ही जाणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार त्याठिकाणी दलित वस्ती आणि आदिवासी वस्तीपर्यंत जाण्याचा मी प्रयत्न करत आहे. असे एकनाथ खडसे म्हणाले.