ताज्या बातम्या

'आधीच्या सरकारने अनेक कामात खोडा घातला' मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरे सरकारवर टीका

आज संभाजी नगरात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली.

Published by : shweta walge

आज संभाजी नगरात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच्या आघाडी सरकारने अनेक कामात खोडा घातला होता, आता तो दूर करुन अनेक कामे मार्गी लावलं असल्याचं ते म्हणाले आहेत.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

आधीच्या आघाडी सरकारने अनेक कामात खोडा घातला होता. आता तो दूर करुन अनेक कामे मार्गी लावली आहेत. पहिल्या कॅबिनेटपासून आजपर्यंत सर्वसामान्याचे हित पाहीले. 35 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली. 8 लाख हेक्टर जमिन ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठवाड्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 14 हजार कोटी सिंचन प्रकल्पावर खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आजच्या बैठकीत झालेले निर्णय -

  • आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सिंचनासाठी साखळी सिमेंट बंधारे तसेच अंबड प्रवाही योजना दिंडोरी जिल्हा नाशिक. आज १४ हजार कोटी रुपयांचे निर्णय फक्त सिंचनासाठी घेतले.

  • पश्चिमवाहिनी नद्याद्वारे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यावर १३ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

  • ३५ सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली

  • सार्वजनिक बांधकामविभागामध्ये १२ हजार ९३८ कोटी ८५ लाख दिले आहेत.

  • महिला सक्षमीकरणावर बैठकीत चर्चा झाली

  • आदर्श पतसंस्थेच्या संचालकांच्या प्रॉपर्टी जप्त करु

  • कृषी, क्रीडा. पर्यटनासह सर्व विभागाला निधी

  • मराठाड्याती ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणार, यासाठी २८४ कोटींचा निधी लागले.

  • पुणे संभाजीनगर मार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम बसवणे - १८८ कोटींचा निधी

  • पैठणमधील संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करण्यासाठी १५० कोटींचा निधी जाहीर करण्यात आला

  • शनी देवगाव उच्च पातळी बंधारा - २८५ कोटी

  • परभणीच्या पाथरीतील साईबाब तीर्थक्षेत्र विकास आराखडा - ९१.८० कोटी

  • औढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा विकास - ६० कोटी

  • मराठवाड्यात दूध उत्पादनाला वेग देण्यासाठी ३ हजार २२५ कोटी रुपयांची निधी

  • वैयक्तिक बचत गट शेतकरी उत्पादक कंपन्यांना किमान ५ आणि कमाल १० दुधाळ जनावरांचे वाटप

  • एका गावात किमान ५० दुधाळ जनावरांचे अनुदान तत्त्वावर वाटप

  • मराठवाड्यातील १ हजार ३० कि मी लांबीच्या ३१ रस्त्यांची सुधारणा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू; आजही विविध मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरणार

Ajit Pawar : 'विकास हाच केंद्रबिंदू मानून आम्ही काम करत आहोत'

Homeopathic Doctor : आजपासून आझाद मैदानात होमिओपॅथी डॉक्टरांचं उपोषण

Shashikant Shinde : शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष