Devendra Fadnavis - Eknath Shinde Team Lokshahi
ताज्या बातम्या

देवेंद्र फडणवीस दिल्लीवरुन गोड बातमी घेऊन येणार; उद्या शपथविधी होणार

दिल्लीत ते अमित शहा आणि जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याचं बोललं जातंय.

Published by : Team Lokshahi

दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून, उद्या राज्यात मंत्रीमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता असल्याचं वृत्त समोर आलंय. संभाव्य मंत्रीमंडळाची यादी देखील समोर आली आहे. राज्यातील जवळपास 12 मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता आहे. मात्र आता पुन्हा एकदा या शपथविधीमध्ये अडथळे येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते अमित शहा आणि जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याचं बोललं जातंय.

विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार उद्या पहिल्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाचे सात, तर शिंदे गटातील पाच अशा 12 मंत्र्यांना सामावून घेतलं जाण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येतंय. मंत्रीपदं कुणाला मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. कारण शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांपैकी अनेकांना मंत्री पदाची अपेक्षा आहे. तर भाजपला यातून मुंबई महानगरपालिकेचं देखील गणित साधायचंय. त्यामुळे भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्यासह गणेश नाईक, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा यांची नावं चर्चेत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा