कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले होते की, "शासन शेतकऱ्यांकडून एक रुपया घेतं. त्यामुळे शासनच भिकारी आहे. शेतकरी भिकारी नाही. एक रुपया ही किंमत फार थोडी आहे. एक रुपयाच्या विम्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच-साडेपाच लाख बोगस अर्ज माझ्याच काळात सापडले. मी ते बोगस अर्ज तत्काळ रद्द केले".
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी मंत्री माणिक कोकाटे यांच्याबद्दल प्रतिक्रिया देत म्हटलं की, "जे काही प्रकार सुरू आहेत त्यांनी याबाबत स्पष्टीकरण केले आहे. जे काही आहे त्याची पडताळणी होईल. दूध का दूध पाणी का पाणी होईल. शेतकरी हा आमचा अन्नदाता आहे, मायबाप आहे, बळीराजा कायम सुखी होऊ दे, चांगलं पीक येऊ दे, अशी आम्ही बळीराजासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो".
शेतकरी भिकारी नाही, तर शासन भिकारी कोकाटे बोलले यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "अस मंत्री महोदयांनी बोलू नये. त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार आहेत त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याबाबत तेच निर्णय घेतील. मला वाटतय खरं काय आहे ते पाहतील".