दिल्लीत राजकीय बैठका रंगणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे दिल्ला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदेंनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेऊन महत्वाच्या विषयावर चर्चा केली आहे. महत्त्वाचं म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये चित्र अजूनही स्पष्ट नाही, राज्यात एकत्र असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विरोधात कसे लढायचं? या मूळ प्रश्नावरती दिल्लीमध्ये खलबते होणार असल्याची शक्यता या बैठकीवरुन वर्तावली जात आहे. दरम्यान यावेळी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतल्याच यावेळी पाहायला मिळालं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी मोदींना भेटलो. ते दिवाळीदरम्यान व्यस्त होते त्यामुळे त्यांनी मला आज वेळ दिला त्यामुळे ही सदिच्छ भेट होती. मी दिल्लीला गेलो, गावी गेलो तरी चर्चा होतेच, त्यामुळे चर्चा करणारे चर्चा करतात. मोदी साहेब हे जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा ते विकासावरच बोलत असतात. मग ते महाराष्ट्राच्या विकासावर असो, देशाच्या प्रगतीवर असो, त्यामुळे त्यांना भेटल्यानंतर एनडीएची एक प्रेरणा ही मिळते. त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना देखील उजाळा दिला. मोदींच एनडीएबद्दल आणि महायुतीबद्दल मत स्पष्ट आहे".
महायुतीतील वादावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत की स्थानिक स्वराज्य निवडणुक आपणही लढवावी, पण याबाबत महायुतीतील वरिष्ठ योग्य निर्णय घेतील आणि कार्यकर्त्यांना तो फॉलो करावा लागेल. रवींद्र धंगेकरांना माझ्याकडून निरोप दिला गेला आहे की, महायुतीत कुठेही मतभेद होता कामा नये. महायुतीमध्ये कुठेही मीठाचा खडा पडता नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्यानी महायुती जपली पाहिजे. महायुतीमध्ये कुठेही मतभेद होतील असं वक्तव्य कोणीही करु नये".