उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंच्या विरोधात आणि मेळाव्या विरोधात कोणत्याही प्रकारची टीका न करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षातील प्रवक्तांना आणि नेत्यांना दिले. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी देखील शिंदेच्या निर्देशास सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान नरेश म्हस्के म्हणाले की," ठाकरेंच्या मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरेंच्या भाषणात वर वरचा दिखावा पाहायला मिळाला. त्यांनी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाषण केलं होत. त्यांनी मराठीच्या अजेंड्याच्या नावावर मुंबई महापालिका निवडणूकीत स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्याच काम करत होते. या उलट राज ठाकरे यांनी त्यांचा शब्द पाळला, त्यांनी कोणताही पक्ष, कोणताही झेंडा अशी भूमिका घेतली नाही. त्यांनी केवळ मराठी माणूस आणि मराठी भाषा याबद्दल आपलं वक्तव्य मांडल".
"त्यांनी कोणत्याही पक्षावर तसेच कोणत्याही नेत्यावर टीका केली नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. यादरम्यान राज साहेब ठाकरे यांच्यावर किंवा त्यांच्या विरोधात बोलण्याचा विषय काय येतो? मात्र उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाच्या आणि मराठी भाषेच्या नावावर आमच्यावर टीका केल्या अनेक नेत्यांवर टीका केली. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलत राहू" अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटातील नरेश म्हस्के यांनी दिली.