दिल्लीत राजकीय बैठका रंगणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे दिल्ला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे दिल्लीत अमित शाह यांची भेट घेऊन महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहेत. यावेळी महायुतीत शिवसेनेच्या मंत्र्यांची आमदारांची निधी वाटपाबाबत असलेली नाराजीबाबत या भेटीत चर्चा होण्याची शक्यता वर्तावली जात आहे.
तसेच ठाण्यात सुरू असलेल्या मंत्री गणेश नाईक यांच्या बैठकीवर देखील शिंदे चर्चा करणार. महत्त्वाचं म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये चित्र अजूनही स्पष्ट नाही, राज्यात एकत्र असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विरोधात कसे लढायचं? या मूळ प्रश्नावरती दिल्लीमध्ये खलबते होणार असल्याची शक्यता या बैठकीवरुन वर्तावली जात आहे.
शिवसेनेची भूमिका ही महायुती म्हणून निवडणूक लढायची आहे, मात्र महायुतीमध्ये राहून शिवसेनेच्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला घेऊन वक्तव्य केली जातात. या विरोधी भूमिका घेत असणाऱ्या आमदार व मंत्र्यांबद्दल देखील दिल्लीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर विरोधात लढलो तर जनसामान्यांमध्ये एक चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असल्याच महायुतीतून म्हटलं जात आहे. राज्यात एकत्र असताना स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुकीत विरोधात का हा प्रश्न जनतेला पडू शकतो.. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नेमकं कसा लढायचं, यावर दिल्लीत विचार मंथन होणार.
मुख्य म्हणजे महायुती म्हणून लढलो तर ठीक मात्र विरोधात लढलो तर कोणाच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवायची या प्रश्नावर देखील चर्चा होण्याची शक्यता. त्याचसोबत भाजपचा मुंबईत 150 जागा लढण्याचा मानस आहे, तर शिवसेनेचे देखील शंभरहून अधिक जागेची मागणी आहे. त्यामुळे त्याच शिवसेनेसाठी जागा वाटपात नेमकी काय गणित असतील यावर चर्चा होणार.