ताज्या बातम्या

Eknath Shinde On Coastal Road: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! वांद्रे- वरळी कोस्टल रोड उद्यापासून सुरु

वरळी-वांद्रे सी लिंकला जोडणारे पुलाचे काम पूर्ण, उद्यापासून दुतर्फा वाहतूक सुरू, मुंबईकरांसाठी तीन आंतरमार्गिका खुल्या.

Published by : Prachi Nate

मुंबई किनाऱ्यावरून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सी लिंकला जोडणारे पुलाचे काम पुर्ण झालं असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले आहे. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड आणि वरळी बांद्रा सी लिंकला जोडणाऱ्या मार्गिकचे लोकार्पण पार पडले आहे.

सी लिंकला जोडणाऱ्या पुलावरून उद्यापासून दुतर्फा वाहतूक सुरू होणार आहे. मुंबईकरांसाठी अवघ्या १२ मिनिटात थेट वांद्रे ते मरीन ड्राईव्ह प्रवास शक्य होणार आहे. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस् जंक्शन आदी भागातील प्रवाशांसाठी देखील तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत. तसेच मुंबई किनारी रस्ता दररोज सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत खुला राहणार आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ही अतिशय गर्वाची बाब आहे- एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सी लिंक ते मरीन ड्राईव्ह १०-१२ मिनिटात शक्य झाल्यामुळे वेळेची बचत होईल इंधनाची बचत होईल असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. तसेच पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, आत्ता तिसऱ्या टप्प्यात काम पूर्ण होईल... वरून बघितलं तर परदेशातील पुल आहे असं वाटतं, ही अतिशय गर्वाची बाब आहे...

जर सरकार बदललं नसते, तर....

तसेच मविआला टोला देत एकनाथ शिंदे म्हणाले की, आत्ता १० मिनिटात मरीन ड्राईव्ह ला पोहचू त्यामुळे काही लोकांना वरळीत लवकर पोचता येईल अधिकचा वेळ मिळेल. जर सरकार बदललं नसते, तर MTHL, मेट्रो हे काहीच दिसलं नसते... कामात खोडा घालणारे ते लोक आहेत. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर घणाघात टीका केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा