भारत मजबूत आहे. मोदींचं सरकार आल्यावर पुलवामाचा बदला बालाकोटामध्ये घेतला. राहुल गांधींना मतं मागण्याचा नैतिक अधिकार नाही. जाहिरात प्रसिद्ध केली, त्या जाहिरातीमध्ये काय म्हणाले आहेत, आज तुमच्या मतामुळे कुठे जल्लोष व्हायला हवा भारतात की पाकिस्तानात, ह्याच्यामध्ये काँग्रेसचं नाव घेतलं आहे का? बिलकुल नाही. तो काँग्रेस निवडणुक आयोगाकडे इकडे तिकडे तक्रार करण्याचं कारण काय? या जाहिरातीमध्ये साफ लिहिलं आहे तुमच्या मतामुळे कुठे जल्लोष व्हायला हवा पाहिजे भारतात की पाकिस्तानात ह्याच्यामध्ये काँग्रेस आहे मग काँग्रेसने एवढं मनाला लावून घेण्याचं कारण काय? काँग्रेसच्या चोराच्या मनात चांदणं म्हणतो आपण ते म्हणजेच त्यांचीच वृत्ती आहे ते पाकिस्तान जे धोरण आहे, पाकिस्तानने पण म्हटलं होतं की कसाबच्या गोळीने हे करकरेचा मृत्यू झाला नाही पण शेवटी पाकिस्तानला हे मान्य करावं लागलं की कसाब हा त्यांचा नागरिक होता. पाकिस्तानचे अतिरेखी देखील अतिरेखी नाही असं देखील वक्तव्य काँग्रेस करु शकतं मतांच्या लाचारासाठी आणि या पूर्वी देखील केलं आहे. 370 कलम हटलं हे धाडस अमित भाईंनी आणि मोदींजींनी दाखवलं. हे आमच्या बाळासाहेबांचं देखील स्वप्न होतं आणि याला म्हणतात देशभक्ती. शहिदांचा अपमान करणारं भाष्य काँग्रेसने केलं आहे. त्या देशातील जनता आणि महाराष्ट्रातील जनता दिल्याशिवाय राहणार नाही.
आज त्यांच्या गळ्यात गळे घालून जे नकली हिंदूत्ववादी मोदी साहेबांनी म्हटलेलं नकली आहे ते आता का गप्प बसले त्यांना ही भूमिका जे घेणारी ही देशविरोधी पाकिस्तान धार्जिणी त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून बसताना थोडे काही वाटत नाही ना जनाची ना मनाची वाटली पाहिजे. आता बाळासाहेब असते ना चांगलं धू धू धुतलं असतं त्यांना आणि म्हणून अतिशय दुर्देवी वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी जाहीर या वक्तव्याचा निषेध करतो.
हा वड्डेटीवार त्या राहुल गांधींच्या नादाने पिसाळला आहे. त्याचं डोकं फिरलेलं आहे. मी त्याला चांगलं समजवत होतो शिवसेनेमध्ये होता तेव्हा बाळासाहेबांच्या विचारांने चांगलं काम करायचा. काँग्रेसमध्ये गेल्यामुळे तो राहुल गांधी जसं आपल्या विदेशामध्ये आपल्या देशाची बदनामी करतो, पंतप्रधानांची बदनामी करतो आणि भारत छोडो नाही तर भारत तोडो यात्रा काढतो त्याच्या नादाला लागून तो ही बिघडलेला आहे. दुसरं आरएसएसच्या बाबतीमध्ये पोलीस हा कोणत्याही पक्षामधला नसतो. जेव्हा त्याचं संकट भूमेवर येतं तेव्हा छातीचं कोट करुन तो स्वतः उभा राहतो आणि आपल्या लोकांची सुरक्षा करतो. आणि आरएसएसची भाषा केल्यावर आरएसएस पण राष्ट्रभक्ती आहे त्यांच्याही नसानसांत राष्ट्रभक्ती भरलेली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय वड्डेटीवारांवर जोरदार टीका केली आहे.