भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केलं आहे. एका सभेमध्ये बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस 2034 पर्यंत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील.विकसित महाराष्ट्राचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे."
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारले असता त्यांनी एका शब्दात शुभेच्छा असे म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.