ताज्या बातम्या

Eknath shinde : महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा जागासाठी आग्रह...

राज्यात लवकरच महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुका लागणार आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती, आघाडी मध्ये लढायच्या की, स्वबळावर यावर विविध राजकीय पक्षांकडून वक्तव्य सुरु झाली आहेत.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • आगामी मुंबई महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची असणार

  • एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती जागा हव्या?

  • 50 ते 60 नगरसेवक हे शिंदेसेनेत

राज्यात लवकरच महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुका लागणार आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती, आघाडी मध्ये लढायच्या की, स्वबळावर यावर विविध राजकीय पक्षांकडून वक्तव्य सुरु झाली आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये सर्वात महत्वाची निवडणूक आहे ती मुंबई महानगरपालिकेची. मागच्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच वर्चस्व आहे. मात्र, आता शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर चित्र बदलणार का? ते पुढच्या काही महिन्यात स्पष्ट होईल. आज मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाइतकीच भाजपची ताकद झाली आहे. मागच्या दोन निवडणुकीत भाजपने मुंबईत निम्म्या विधानसभेच्या जागा जिंकल्या.

यावेळी काहीही करुन मुंबई महापालिका उद्धव ठाकरेंकडून काढून घ्यायची, तिथे भाजपचा झेंडा फडकवायचा असा चंग भाजपने बांधला आहे. त्यात शिवसेनेत पडलेले दोन गट यामुळे यंदाची महापालिका निवडणूक उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी परीक्षा असणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक युती म्हणून लढवणार असं एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपकडून सांगितलं जातय. पण लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे जागा वाटपावरुन पेच फसू शकतो. महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना जिंकलेल्या जगांसाठी आग्रही आहे.

50 ते 60 नगरसेवक हे शिंदेसेनेत

2017 साली जिंकलेले नागरवसेवक जे आता शिंदेसेनेत आहेत, त्या जागा आम्हाला मिळाव्यात यासाठी शिवसेना आग्रही आहे. 2017 साली शिवसेनेने एकूण 84 जागा जिंकल्या होत्या. त्यातील आता जवळपास 50 ते 60 नगरसेवक हे शिंदेसेनेसोबत आहेत. सर्व जागा आम्हाला मिळाव्या ही शिवसेनेची आग्रही मागणी आहे. इतर उरलेल्या जागांमध्ये समसमान वाटप व्हावं. मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपा संदर्भात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ही मागणी आहे. मुंबई महापालिकेत 227 जागा आहेत. त्यातील किमान 100 ते 110 जागा मिळाव्यात ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मागणी आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात भाजपचा जोर आहे. विधानसभेला मुंबईतही एकनाथ शिंदे यांनी काही जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे जिंकलेल्या जागा परत मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आग्रही आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा