ताज्या बातम्या

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात 'हे' घेतलेले ऐतिहासिक निर्णय

अजित पवार यांच्या निधनामुळे (Ajit Pawar Death) संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या दुखद पार्श्वभूमीवर येत्या ९ फेब्रुवारी रोजी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ रिदि (Eknath Shinde) यांनी घेतला आहे.

Published by : Varsha Bhasmare

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे (Ajit Pawar Death) संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या दुखद पार्श्वभूमीवर येत्या ९ फेब्रुवारी रोजी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ रिदि (Eknath Shinde) यांनी घेतला आहे. परंतु आपण एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेले मोठे निर्णय जाणून घेऊ या...

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक धाडसी, लोकाभिमुख आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले. प्रशासन, सामाजिक न्याय, महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग आणि सर्वसामान्य कुटुंबांना केंद्रस्थानी ठेवत शिंदे सरकारने निर्णयांची एक मजबूत मालिका राबवली. या निर्णयांमुळे राज्याच्या विकासाला गती मिळालीच, पण सामान्य माणसाच्या जीवनात प्रत्यक्ष बदल जाणवू लागला.

मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सर्वात आधी भर दिला तो सामाजिक समतोल आणि आर्थिक दिलासा यावर. महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना हा त्यातील महत्त्वाचा निर्णय ठरला. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. घरखर्च, आरोग्य, शिक्षण अशा बाबींमध्ये महिलांना आधार देणारी ही योजना ठरली.

वयोश्री योजना

ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना लागू करत ६५ वर्षांवरील नागरिकांना दरमहा ३००० रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. वाढत्या महागाईच्या काळात वृद्धांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरला.

नमो शेतकरी महासन्मान योजना

शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने अनेक ऐतिहासिक पावले उचलली. नमो शेतकरी महासन्मान योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची थेट मदत देण्याचा निर्णय झाला. तसेच, एक रुपयात पीक विमा योजना राबवून शेतकऱ्यांना अत्यल्प प्रीमियममध्ये पीक विम्याचे संरक्षण देण्यात आले. यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीचा भार कमी झाला.

बळीराजा मोफत वीज योजना

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बळीराजा मोफत वीज योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठराविक मर्यादेपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सिंचन खर्चात मोठी बचत झाली.

तीर्थदर्शन योजना

धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातही शिंदे सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले. तीर्थदर्शन योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना शासकीय खर्चाने धार्मिक स्थळांची यात्रा घडवून आणण्याचा निर्णय झाला. यामुळे अनेक वृद्धांची आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली.

एसटी प्रवास सवलत योजना

एसटी प्रवास सवलत योजना अंतर्गत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत देण्यात आली. यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढला आणि सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळाला.

तरुणांसाठी युवा कार्य प्रशिक्षण योजना

तसेच, तरुणांसाठी युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवून बेरोजगार तरुणांना कौशल्य प्रशिक्षणासोबत मासिक वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला. रोजगारक्षम तरुण घडवण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला.

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात घेतलेले हे निर्णय केवळ कागदावर मर्यादित न राहता थेट जनतेच्या जीवनाशी जोडले गेले. त्यामुळेच शिंदे सरकारचा कार्यकाळ ‘लोकाभिमुख निर्णयांचा काळ’ म्हणून ओळखला जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा