राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण टप्पा ठरलेल्या अमरावती विमानतळ आहे. त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मिश्किल शैलीत विरोधकांवर टीकेची झोड उठवली, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमरावतीच्या भविष्यातील उड्डाणाचा मार्ग स्पष्ट केला आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "2014 ते 2019 या कालखंडात फडणवीस मुख्यमंत्री असताना विमानतळाच्या कामाची सुरुवात झाली होती. मात्र, त्यानंतर आलेल्या सरकारने हे काम पूर्णतः थांबवलेले काम 2022 मध्ये महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही हे प्रकल्प गतीने पुन्हा सुरू केले." एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.यावेळी शिंदे यांनी आपल्या सध्याच्या भूमिकेची तुलना विमानाच्या पायलट आणि को-पायलटशी केली शिंदे म्हणाले की, "त्या वेळी मी पायलट होतो आणि फडणवीस व अजित पवार को-पायलट. आता देवेंद्रजी पायलट आहेत आणि आम्ही को-पायलट."
एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, "पायलट बदलला तरी विमानाचं इंजिन तेच आहे, आणि तेच विकासाचं इंजिन आम्हाला पुढे घेऊन जात आहे. त्यावेळी त्यांनी मुंबई समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, अटल सेतू आणि नवी मुंबई विमानतळ अशा महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा आढावा घेत विरोधकांवर टीका केली. त्यावेळी शिंदे म्हणाले की, "आधीच्या सरकारकडे अडचणींचा पाढा होता, विकासाचा नव्हता."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या पायलट ट्रेनिंग स्कूलबाबत महत्त्वाची घोषणा करताना सांगितले की, "ही शाळा अमरावतीला जागतिक नकाशावर स्थान मिळवून देईल. केंद्र सरकारने दिलेल्या पहिल्याच विमानातून आम्ही इथे आलो आहोत," असं सांगताना त्यांनी या उपक्रमाचं महत्त्व अधोरेखित केलं.