मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने लोकसभा मतदारसंघ निहाय बैठक मातोश्री निवासस्थानी सुरू असताना एकीकडे उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बॅनर लावण्यात आले आहेत.
कलानगर जंक्शन येथील सिग्नलसमोर शिंदेंच्या समर्थनात बॅनरबाजी करण्यात आली आहे. मेहनती, प्रामाणिक, निडर अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. दोन्ही गटात वाकयुद्ध सुरूच असून बॅनरबाजीमुळे चर्चांना उधाण आले आहे. असे बॅनर मुंबईत अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री डरपोक असल्याची टीका शुक्रवारी केली होती त्यानंतर आता हे बॅनर लावण्यात आलेत.