महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संभाजी महाराजांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यातमध्ये गेले होते. एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळेस शिंदे यांनी कॉग्रेसवर टिकास्त्र केले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, "महाराष्ट्रातल्या जनतेने विरोधी पक्ष नेत्यांना विरोधी पक्ष राहण्या इतकेही संख्याबळ दिले नाही. महायुती सरकारला दैदिप्यमान असा विजय मिळाला आहे. कॉंग्रेससारखे आम्ही आश्वासन देऊन ती कामे पुर्ण केली नाही, असे महायुती सरकार नाही. कॉंग्रेस हे त्याच्या काळातील सर्वात मोठे थापाडे सरकार आहे. त्यांच्या काळात वीज बिल माफ केलं होते आणि सरकार आल्यावर लगेच नागरिकांना हातात बिल पाठवली. मग थापाडे कोण? आम्ही कि ते, राज्याची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसताना देखील सरकारी योजना तसेच लोकांचा पगारही सुरु राहिले पाहिजे. असे सर्व करत महाराष्ट्र राज्य मजबूत बनते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आम्ही सर्वांनी महाराष्ट्राला देशामधले नंबर एकचे राज्य म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाते. महाराष्ट्रात सर्वांत जास्त विकास प्रकल्प सुरु असल्याने आर्थिक क्षमता वाढली आहे. "
सौगात- मोदी भेटवस्तू याबद्दल एकनाथ शिंदे म्हणाले की, "मुस्लिम बांधवाना भेट दिली जाणार आहे. या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींनी लोकसभा निवडणुकीमध्ये ते कसे वागले ते पाहावे. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी लोकांना भडकवले. संविधान बदलणार तसेच मुस्लिम बांधवाच्या मनात भीती निर्माण केली. संविधान धोक्यात आहे, असे सांगितले गेले. आता ते लोक पंतप्रधान मोदींविरुद्ध आरोप करत आहेत. मोदींनी 35 कोटींहून अधिक लोकांना द्रारिद्र रेषाच्यावरती आणले आहे. 80 कोटी लोकांना रेशन दुकानावर मोफत धान्य देत आहेत. मोदींनी महिलांसाठी अनेक योजना आणल्या. त्यामध्ये फक्त हिंदू महिला आहेत का? मुस्लिमान महिलावर्ग नाही. सर्व समाजातील महिलांचा समावेश मोदींच्या योजनेमध्ये आहे. त्यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीपासून विरोधकांच्या पोटात दुखतंय."
महापुरुषांच्या अवमानवर एकनाथ शिंदे म्हणाले की, "महापुरुषांवर जो कोणी बोलेल त्याला सोडलं जाणार नाही. त्यासाठी कडक कारवाई तसेच कडक नियम लावले जातील." असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.