ताज्या बातम्या

'मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसायचं होतं, पण...' मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंबाबत खळबळजनक दावा

आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा दसरा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना उद्धव ठाकरेंबाबत खळबळजनक दावा केला

Published by : shweta walge

आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा दसरा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना उद्धव ठाकरेंबाबत खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले की, सन २००४ पासूनच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसायचं पण त्याचा जुगाड लागत नव्हता असं ते म्हणाले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

खरं म्हणजे बाळासाहेबांना मी शब्द दिला म्हणाले शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री बनवणार. शिवसैनिकाला पालखीत बसवणार. आम्ही सगळे विचार करु लागलो, कुठल्या शिवसैनिकाला बसवणार. कुणाला संधी मिळणार. पण हे महाशय टुमकन उडाले आणि टुमकन त्या खुर्चीत जाऊन बसले.

मागचं-पुढचं सगळं सोडलं आणि मला म्हणाले मला कुठं व्हायचंय! पवार साहेबांनी सांगितलं. पण पवार साहेबांकडं दोन माणसं पाठवली तुम्ही आणि उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस करा म्हणून पवार साहेबांना विनंती केली हे कधी लपत नसतं.

तुमच्यावर किती केसेस आहेत? किती लाठ्या खाल्ल्या ते सांगा. तुमची बँक देना नव्हती तर लेना बँक होती. बाळासाहेबचा वारसा सांगणाऱ्यांनी आपला चेहरा आरसामध्ये पाहावा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तरी काही बदल झाला का?

कोरोनाच्या काळात तुम्ही घरे पैसे मोजत होता. खिचडीमध्ये पैसे खाल्ले, ऑक्सीजनमध्ये पैसे खाल्ले, कुठे फेडाले हे पाप. तुम्हाला जनता माफ करणार नाही. मुंबई पालिकेच्या कामात तुम्ही काळ्याचं पांढर करत होतात. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबईला कोणाचा बाप तोडू शकत नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा