ताज्या बातम्या

Dasara Melawa : मोठी बातमी! आझाद मैदान नाही तर..., यंदा दसरा मेळाव्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने जागा बदलली

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार होता. त्यासाठी मेळाव्याच्या तयारीला सुरुवात देखील झाली होती.

Published by : Prachi Nate

2 ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्त दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. याचपार्श्वभूमिवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीजर जाहीर झाला असून लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडला वाघ असा उल्लेख करून टीझरची सुरवात केली आहे. एकंदरीत संपूर्ण टीझरमध्ये टार्गेट उद्धव ठाकरे आहेत हे स्पष्टपणे दिसून येत आहे. या टीझरद्वारे "शेवटी शिवसेनेच्या वाघाशी बापजन्मात पंगा नको" असा इशाराही देण्यात आला आहे.

यानंतर आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार होता. त्यासाठी मेळाव्याच्या तयारीला सुरुवात देखील झाली होती. मात्र आता शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावर न होता गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पावसाने धुमाकुळ घातला होता. यानंतर आझाद मैदानात चिखल झाले आहे. तसेच 2 तारखेला देखील मुंबईवर पावसाचे सावट असल्याची माहिती हवामान खात्याकडून समोर आली आहे.

याच कारणास्तव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत, शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी नेस्को सेंटरमध्ये होणार असल्याची माहिती दिली. त्याचसोबत शिंदेंच्या शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी निधी संकलित करण्यात येणार आहेत. दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेतील राज्यभरातील पदाधिकारी आणि शिवसैनिक या मेळाव्यासाठी गैरहजर राहणार आहेत.

करण, सर्व पदाधिकारी पूरग्रस्त भागात मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पाऊस असला तरी दसरा मेळावा होणार असून लाखो शिवसैनिक दोन्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला जमणार आहेत. त्यामुळे आता या मेळाव्यातून आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने काय काय घोषणा होणार हे पाहणे म्हत्वाचे आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Politics : ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का! शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिंदे सेनेत प्रवेश

Gopichand Padalkar On Jayant Patil : गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; जयंत पाटलांवर केले खालच्या स्तरावर आरोप

Latest Marathi News Update live : 'देवनार, गोवंडी, मानखुर्दमध्ये जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा'- भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आरोप

Dasara Melava 2025 Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणाची 'दसरा' रणधुमाळी!, जाणून घ्या कुठे कोणाची सभा आहे का?