ताज्या बातम्या

डोंबिवलीत ज्येष्ठ महिलेला तरुणाची मारहाण

डोंबिवली येथे एक घटना घडली आहे या घटनेत एका महिलेला तरुणाने मारहाण केली आहे.

Published by : shweta walge

मयुरेश जाधव, अंबरनाथ: डोंबिवली येथे एक घटना घडली आहे या घटनेत एका महिलेला तरुणाने मारहाण केली आहे. विशेष म्हणजे रामनगर पोलिस ठाण्याच्या बाहेर असलेल्या रिक्षा थांब्यावर गर्दीच्या वेळेत तरुणाने हातातील कड्याने महिलेला मारहाण केली आहे. याप्रकरणी सोहम सावंत याच्याविरोधात रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले.

डोंबिवली मधील तुकाराम नगर परिसरात राहणाऱ्या अंजली देवडिगा (वय 64) या रविवारी सायंकाळी खरेदीसाठी डोंबिवली स्टेशन परिसरात आल्या होत्या. खरेदी केल्यानंतर सायंकाळी 6 वाजता त्या सामान घेऊन रामनगर पोलिस ठाण्याच्या परिसरात असलेल्या रिक्षा थांब्यावर रिक्षा पकडण्यासाठी आल्या. तेवढ्यात तीघे तरुण बाजूने जात असताना त्यातील सोहमचा अंजली यांना धक्का लागला. यावेळी अंजली यांनी माफी मागून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सोहमने त्यांना जोरात धक्का दिला. या धक्क्याने अंजली रस्त्यावर खाली पडल्या. यात त्यांच्या हाताला मार लागला. त्यानंतर संतापलेल्या संतोषने हातातील कडा काढून त्यांच्या डोक्यात मारला. यामुळे अंजली यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. हे पाहून जमलेल्या जमावाने संतोष याला पकडून जवळच असलेल्या रामनगर पोलीस ठाण्यात नेले. अंजली यांना देखील पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दिवा येथे राहणाऱ्या सोहम याच्या विरोधात  कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला नोटीस बजावण्यात आली आहे.

अंजली यांच्या डोक्यातून रक्त वहात असल्याने स्टेशन परिसरातील एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी उपचारा अंती त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा