आज (1 नोव्हेंबर) मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी एल्गार पुकारणार आहेत. आज मुंबईत (Mahavikas Aghadi Mumbai Morcha) महाविकास आघाडी आणि मनसे आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचं सत्याचा मोर्चा असं नामकरण करण्यात आलंय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, बाळासाहेब थोरात या मोर्चाला उपस्थित आहेत. यावेळी कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भाषण केले आहे.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, "संविधान वाचविण्यासाठी सत्याचा मोर्चा इथं आला. राहुल गांधींनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर आयोगाने उत्तर दिलं ते इतिहासतील बोगस उत्तर दिलंबोगस पद्धतीने बोगस मतदान केलं. स्थानिक स्वराज्य संस्थेला आहे ती मतदान वापरू नका. आयोगाने हरकतीकर माहिती न घेता माहिती दिलीआम्ही गेलो तेव्हाही उत्तर दिलं नाही. मतदार यादी दुरुस्त झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नका, लाखोंचा मोर्चा आला नजर जाईल तिथपर्यंत मोर्चा आहे."