ताज्या बातम्या

Election commission : दुबार मतदारांसंदर्भात निवडणूक आयोग अलर्टवर... काढला डबल स्टारचा तोडगा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल अखेर वाजलं आहे. आज (4 नोव्हेंबर) राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीची घोषणा केली.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • दुबार मतदारांसंदर्भात निवडणूक आयोग अलर्टवर

  • दुबार मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करता येणार

  • दुबार मतदारापुढे 'डबल स्टार'चं चिन्ह केलं जाणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल अखेर वाजलं आहे. आज (4 नोव्हेंबर) राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीची घोषणा केली. या घोषणेनुसार आता राज्यात एकूण 246 नगपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. यात 15 नव्या नगरपंचायती आहेत. दरम्यान, या निवडणुकीची घोषणा होण्याआधी महाविकस आघाडी तसेच मनसेने मतदार याद्यांत घोळ आहे. अनेक मतदार दुबार आहे, असा आरोप करत मतदार याद्या स्वच्छ करा आणि मगच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणू घ्या, अशी मागमी केली होती. विरोधकांच्या याच आक्षेपाला झुगारून आता राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आहेत. सोबतच दुबार मतदारांचा घोळ मिटावा यासाठी एक तोडगा काढला आहे.

मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने एक संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर मतदारांना त्यांचे नाव शोधता येईल. याशिवाय मतदारांच्या सोईसाठी एक विशेष अॅपही विकसित करण्यात आले आहे. या मोबाईल अॅपच्या मदतीने मतदारांना त्यांचे मतदार यादीतील नाव शोधता येईल. सोबतच त्यांच्या मतदान केंद्राचाही शोध घेता येईल. उमेदवार कोण आहे, त्यांच्या विरोधात किती गुन्हे दाखल आहेत याचाही शोध मतदारांना घेता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

काढला डबल स्टारचा तोडगा

तसेच, मतदार याद्यांतील संभाव्य दुबार नावांचीही राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतली आहे. निवडणूक आयोगाने आपल्या त्यांच्या सिस्टिमवर एक टूल विकसित केले आहे. याच टूलच्या मदतीने प्रत्येक नगरपरिषद, नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य मतदाराच्या नावापुढे डबल स्टार दिसेल, असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

नाव, फोटो, पत्ता तपासला जाणार

जिथे-जिथे मतदाराच्या नावापुढे डबल स्टार आलेले आहेत, तिथे तिथे संबंधित अधिकारी प्रभागामध्ये, मतदान केंद्रामध्ये तो मतदार कुठे मतदान करेल याची माहिती घेईल. त्याचे नाव, लिंग, फोटो, पत्ता सर्व बाबी तपासल्या जातील. ज्या मतदान केंद्रामध्ये दुबार मतदाराला मतदान करायचे आहे, त्या मतदान केंद्रावर त्याला मतदान करायची सोय असेल. अन्य मतदान केंद्रावर त्या मतदाराला मतदान करता येणार नाही.

मतदाराकडून लिहून घेतले जाणार प्रतिज्ञापत्र

ज्या मतदाराच्या नावापुढे डबल स्टार आलेले आहे आणि त्याने काहीही प्रतिसाद दिला नाही तर सर्व मतदान केंद्रांवर त्याच्या नावापुढे डबल स्टार दाखवले जाईल. असा मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाईल. मी या मतदान केंद्राव्यतिरिक्त इतर मतदान केंद्रावर मतदान केलेले नाही, तसेच अन्य मतदान केंद्रावरही मतदान करणार नाही असे मतदाराकडून लिहून घेतले जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा