ताज्या बातम्या

आज मुंबईत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्‍ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा ते आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार महाराष्ट्र दौऱ्यावर असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक होणार आहे. 27 ते 28 सप्टेंबर असा दोन दिवसीय त्यांचा दौरा होणार आहे.

यासोबत निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांचा शिष्टमंडळात समावेश असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी पावणेचार वाजता हॉटेल ट्रायडेंट येथे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून या पत्रकार परिषदेमध्ये काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ओबीसी नेत्यांची आज नागपुरात महत्त्वाची बैठक

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार

Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार; गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतली जबाबदारी

Harbour Line Mega Block : आज रात्रीपासून हार्बर रेल्वे मार्गावर साडेचौदा तासांचा ब्लॉक; वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान लोकल सेवा बंद