ताज्या बातम्या

Loksabha Election 2024 : मुंबईतील 509 डॉक्टरांना निवडणुकीचं काम, डॉक्टरांमध्ये एकच संताप

Published by : Dhanshree Shintre

Doctor, Nurses Election Duty: लोकसभा निवडणूकांची घोषणा झाल्यानंतर विविध पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका आस्थापनेवरील वैद्यकीय सेवेतील डॉक्टर्स, परिचारिका यांना या निवडणूकीदरम्यान सेवा बजावण्यासाठी आदेश देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. अशा पध्दतीने वैद्यकीय सेवेतील डॉक्टर्स, नर्सेस यांना निवडणूक विषयक देण्यात आलेल्या आदेशांची माहिती घेऊन अशा अत्यावश्यक सेवेतील अधिकारी/ कर्मचारी यांचे निवडणूक विषयक कामाबाबतचे आदेश तात्काळ रद्द करण्यात येतील असे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांनी कळविले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कर्तव्यावर रुजू करण्यात येत असते. मात्र, यंदा प्रथमच मुंबई पालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांचीही निवडणुकीच्या कामावर नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये वैद्याकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, वैद्याकीय अधीक्षक यांच्यासह विभाग प्रमुख व प्राध्यापकांना निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असलेल्या 1 हजार 67 परिचारिकांनाही निवडणुकीच्या कामावर रुजू होण्याबाबत निवडणूक विभागाकडून पत्र पाठविण्यात आले आहे.

तसेच यामुळे मुंबई पालिकेतील डॉक्टरांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून, त्यांनी रुग्णालयाला टाळे ठोकून आता आम्ही निवडणुकीच्या कामावर जातो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुंबई पालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि नायर दंत महाविद्यालयातील 506 डॉक्टरांना तर 1 हजार 67 परिचारिकांना निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केल्याचे पत्र जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून बुधवारी पाठविण्यात आले. मुंबईतील पालिका रूग्णालयांतील सुमारे 80 टक्के स्टाफ इलेक्शन ड्युटीवर जाणार आहे.

दरम्यान, मुंबईतील जेजे, केईएम, सायन, बीवायएल नायर, आरएन कूपर आणि नायर डेंटलसह वैद्यकीय संस्थांमधील आरोग्य कर्मचाऱ्यांना मतदानाचे कामे देण्याची ही पहिलीच घटना आहे. मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये केईएम रुग्णालयातील 900 डॉक्टर आणि परिचारिका, शीव रुग्णालयातील 130 डॉक्टर आणि 125 परिचारिका, कूपर रुग्णालयातील 88 डॉक्टर आणि 180 परिचारिका, नायर रुग्णालयातील 70 डॉक्टर व 150 परिचारिका आणि नायर दंत महाविद्यालयातील 12 डॉक्टर व 12 परिचारिका आणि जेजेमधील 48 जणांना निवडणूक ड्यूटीचे पत्रे मिळाली आहेत.

Daily Horoscope 12 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचे आर्थिक समस्या दूर होतील; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 12 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"कौरवांच्या विरोधात आमची पांडव सेना निवडणुकीच्या रिंगणात उतरले" पुण्यात उपमुख्यमंत्री फडणवीस कडाडले

GT vs CSK : शुबमन गिलच्या नावावर 'या' जबरदस्त विक्रमाची नोंद, अहमदाबादच्या मैदानात पाडला धावांचा पाऊस

"आम्ही पक्ष फोडत नाहीत, घरही फोडत नाहीत, पण..." पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं