ताज्या बातम्या

हिमाचल प्रदेशमध्ये आज निवडणूक; कोण मारणार बाजी

Published by : Siddhi Naringrekar

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 68 जागांसाठी आज मतदानाला सुरुवात होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण ४१२ उमेदवारांचे भवितव्य जनता ठरवणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी झाल्यानंतर हिमाचलची लगाम कोणाच्या हाती राहणार हे निश्चित होणार आहे. यावेळी भाजप, काँग्रेसशिवाय आम आदमी पक्षही शर्यतीत आहे. या निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये एकूण 55,92,828 मतदार आहेत. यामध्ये 28,54,945 पुरुष तर 27,37,845 महिला मतदार आहेत. याशिवाय 38 तृतीयपंथी मतदारही मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याआधी 2017 हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत 75.57 टक्के मतदान झाले होते.

गेल्या दोन निवडणुकांमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या काँग्रेससाठी हिमाचल प्रदेश भाजपकडून हिसकावून घेणे हा तिच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. काँग्रेससाठी हे सर्व जास्त महत्त्वाचे आहे कारण 24 वर्षांनंतर गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीने (मल्लिकार्जुन खर्गे) पक्षाची सूत्रे हाती घेतली आहेत आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी प्रचारापासून पूर्णपणे दूर राहिले आहेत.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह आणि भाजपचे माजी प्रमुख सतपाल सिंह सत्ती यांच्यासह 68 मतदारसंघातील 412 उमेदवारांचे भवितव्य राज्यातील 55 लाखांहून अधिक मतदार ठरवणार आहेत. या निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहे. हिमाचल प्रदेशात शांततेत मतदान पार पडावं यासाठी राज्यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) तैनात करण्यात आलं आहे. सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी 35000 केंद्रीय सुरक्षा दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. राज्यातील अनेक उंच पर्वतीय भागात बर्फवृष्टी झाली आहे, त्यामुळे या भागातील लोकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यात अडचण येऊ शकते.

महाविकास आघाडीतील सांगलीच्या वादावर रोहित पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा

Daily Horoscope 29 April 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 29 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

फडणवीसांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना धाराशिवमध्ये धरलं धारेवर; म्हणाले, "मोदींच्या ट्रेनमध्येच..."