ताज्या बातम्या

शिंदेंचा मविआ धक्का; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017 प्रमाणेच होणार

शिंदे सरकारने (Shinde government ) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक मोठा धक्का दिला असून आता 2017 सालच्या प्रभाग रचनेप्रमाणेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका होणार आहेत.

Published by : Team Lokshahi

शिंदे सरकारने (Shinde government ) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक मोठा धक्का दिला असून आता 2017 सालच्या प्रभाग रचनेप्रमाणेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मविआ सरकारच्या काळात वाढवलेली वॉर्डरचना रद्द करण्यात आली असून यामध्ये मुंबईतील वाढलेल्या 9 वॉर्डचा समावेश आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी हा निर्णय घेतला आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं सांगितलं जातंय.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Cm Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) झाल्यापासून महाविकास आघाडीला एकापाठोपाठ एक मोठे धक्के देत आहेत. त्यातच आता या सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक मोठा निर्णय झाला आहे. मविआ सरकारने वाढविलेले वॉर्ड संख्या नियमबाह्य पद्धतीने केली असल्याने रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वॉर्ड रचना रद्द करुन ती 2011 च्या जनगणनेनुसार 2017 साली वॉर्ड संख्या ठरली होती त्या प्रमाणे कायम ठेवण्यात येणार आहे. राज्यातील येत्या निवडणुका या जुन्याच वॉर्ड रचनेप्रमाणे घेण्यात येणार आहेत.

मुंबईतील वाढवलेले नऊ वॉर्ड रद्द

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना मुंबईतील वॉर्डरचना नऊने वाढवून ती 227 वरुन 236 वर नेली होती. त्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत त्याला विरोध केला होता. वाढवलेले नऊ वॉर्ड हे शिवसेनेच्या फायद्यासाठी असल्याचा आरोपही भाजपने त्यावेळी केला होता. आता शिंदे सरकारने हे वाढवलेले नऊ वॉर्ड रद्द केले आहेत.

राज्याताली जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या वॉर्ड रचनेमध्येही बदल करण्यात आला होता. अनेक ठिकाणी नवीन वॉर्डची रचना करण्यात आली होती. आता ते वाढवलेले नवीन वॉर्डही रद्द करण्यात येत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस