राज्यातील अवाढव्य वीज दरावरून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच महाराष्ट्रात महायुती सरकारने वीज दर कमी करण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
थोडक्यात
इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग- जयंत पाटील
अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग
महाराष्ट्रात वीज दर कमी करण्याची जयंत पाटील यांची मागणी
जयंत पाटील यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून टीका केली आहे. इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्यात सध्या वीज महाग मिळत आहे. आताच्या सरकारकडे प्रचंड बहुमत आहे त्यामुळे वीज दर कमी करण्यात आता कोणतीही अडचण नसावी, असा टोला पाटील यांनी लगावला आहे. जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे.
वीज बिलात ३०% कपात करणार, पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असे महायुती सरकारमधील लोक मागच्या ४-५ महिन्यांपासून म्हणत आहेत. ३०% कपात सोडाच पण इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्यात सध्या वीज महाग मिळत आहे, त्याकडे सरकारने लक्ष द्यावे, असे सांगत जयंत पाटील यांनी इतर राज्यातील वीज दराचा तक्ताच दिला आहे.
कोणत्या राज्यात किती वीज दर?
राजस्थान ७.५५ ते ८.९५ रुपये प्रति युनिट
मध्य प्रदेश ३.३४ ते ६.८० रुपये प्रति युनिट
कर्नाटक ५.९० रुपये प्रति युनिट सरसकट
महाराष्ट्र ५.१६ ते १७.७९ रुपये प्रति युनिट
जयंत पाटील यांची एक्सवरील पोस्ट पाहा-