ताज्या बातम्या

E-Bond System : आजपासून इलेक्ट्रॉनिक बाँडची सुरूवात; ई बाँड म्हणजे काय?

महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, आजपासून (दि.3) राज्यात इलेक्ट्रॉनिक बाँडचा (E-Bond System) श्रीगणेशा होणार आहे. या निर्णयानंतर काय बदलणार? कुणाला फायदा होणार? इलेक्ट्रॉनिक बाँड म्हणजे काय, याचे फायदे काय? याबद्दल जाणून घेऊया…

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • आजपासून राज्यात इलेक्ट्रॉनिक बाँडचा श्रीगणेशा होणार

  • ई बाँड म्हणजे काय? त्याचे फायदे काय?

  • कागदी स्टॅम्पची गरज संपुष्टात येणार

महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, आजपासून (दि.3) राज्यात इलेक्ट्रॉनिक बाँडचा श्रीगणेशा होणार आहे. या निर्णयानंतर काय बदलणार? कुणाला फायदा होणार? इलेक्ट्रॉनिक बाँड म्हणजे काय, याचे फायदे काय? याबद्दल जाणून घेऊया…

ई बाँड म्हणजे काय? त्याचे फायदे काय?

– महाराष्ट्र शासनाचे नोंदणी आणि मुद्रांक विभागामार्फत NeSL आणि NIC या संस्थांच्या तांत्रिक सहाय्याने कस्टम ई-बॉण्ड प्रणालीचा शुभारंभ आज होणार

– या नव्या प्रणालीमुळे आयातदार आणि निर्यातदारांना विविध व्यवहारांसाठी वेगवेगळे कागदी बॉण्ड देण्याऐवजी एकाच इलेक्ट्रॉनिक बॉण्डद्वारे सर्व प्रक्रिया पूर्ण करता येणार

– हे बॉण्ड्स प्रोव्हिजनल असेसमेंट्स, एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम्स, वेअरहाऊसिंग, आणि मॅन्युफॅक्चरिंग इन बॉन्डेड वेअरहाऊसेस इत्यादींसाठी वापरता येणार

– ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असून आयातदार/निर्यातदार ICEGATE पोर्टलवरून ई-बॉण्ड तयार करतील, तर, NeSL द्वारे ई-स्टॅम्पिंग व ई– स्वाक्षरी होईल आणि अखेरीस कस्टम अधिकाऱ्याद्वारे ऑनलाईन पडताळणी होणार

– मुद्रांक शुल्कासह सर्व शुल्काचे भरणे संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केले जाणार

कागदी स्टॅम्पची गरज संपुष्टात येणार

– महाराष्ट्र स्टॅम्प कायद्यानुसार निश्चित केलेले ५०० रुपयांचे शुल्क आता ऑनलाईन जमा करता येणार

यामुळे कागदी स्टॅम्पची आवश्यकता संपुष्टात येईल

– आधार आधारित ई-स्वाक्षरी – आयातदार/निर्यातदार तसेच कस्टम अधिकारी या दोघांच्या ई-स्वाक्षरीमुळे व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होणार

– कागदपत्रांची आवश्यकता पूर्णपणे दूर होऊन पर्यावरण पूरक दृष्टीने ‘ग्रीन गव्हर्नन्स’कडे हे मोठे पाऊल

– रिअल टाईम पडताळणीमुळे कस्टम अधिकाऱ्यांकडून तत्काळ पडताळणी आणि फसवणुकीस आळा बसणार

– ई बाँडमध्ये आधीच्या बाँडमध्ये आवश्यक ते बदल अथवा रक्कम वाढ इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच करता येणार

– सीमाशुल्क प्रक्रिया या प्रणालीमुळे गतिमान होणार, व्यवसाय सुलभ होणार आणि शासनाच्या डिजीटल इंडिया तसेच Ease of Doing Business उपक्रमांना चालना मिळणार

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा

Rain Alert : पुढील काही दिवस पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार...

Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Death : उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं खुलं आव्हान

Pomegranate Vs Beetroot : डाळिंब की बीट... शरीरात रक्त वाढवण्यासाठी काय जास्त फायदेशीर आहे?

Devendra Fadnavis : ठाकरे गटाच्या मेळाव्यावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....