ताज्या बातम्या

खेड्यापाड्यांपर्यंत Starlink चे इंटरनेट ; परवडणारी सेवा की महागडी?

सॅटेलाइट इंटरनेटची भारतात एन्ट्री; Starlink सेवा सामान्यांसाठी कितपत उपयुक्त?

Published by : Shamal Sawant

एलन मस्क यांच्या सॅटेलाइट इंटरनेट कंपनी Starlink ला भारत सरकारने अखेर परवानगी दिली आहे. त्यामुळे देशातील दुर्गम भागांपर्यंत आता जलद इंटरनेट सेवा पोहोचणार आहे. मात्र ही सेवा सर्वसामान्यांसाठी परवडणारी ठरेल का, हा प्रश्न अजूनही कायम आहे.

Starlink च्या सेवा सुरू करण्यासाठी ग्राहकांना सुरुवातीला सुमारे ₹33,000 खर्च करून उपकरण खरेदी करावे लागेल. त्यानंतर दरमहा ₹3,000 च्या आसपास शुल्क आकारले जाईल, ज्यात अनलिमिटेड डेटा दिला जाईल. ही सेवा महागडी का आहे, याचे कारण म्हणजे ती थेट सॅटेलाइटवर आधारित आहे. पारंपरिक मोबाइल टॉवर्सऐवजी यामध्ये सिग्नल थेट अवकाशातून ग्राहकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे उपकरणे आणि सेवा दोन्ही महागड्या असतात. भूतान आणि बांगलादेशमध्येही अशाच प्रकारचे दर लागू आहेत.

Starlink एक महिन्याचा मोफत ट्रायल देण्याची शक्यता आहे, जेणेकरून ग्राहक अनुभव घेऊ शकतील. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर एक-दोन महिन्यांत सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे.

शहरांमध्ये आधीच चांगली इंटरनेट सेवा असल्याने Starlink फारसा उपयोगी ठरणार नाही. पण जिथे अजूनही इंटरनेट पोहोचलेले नाही, तिथे ही सेवा कितपत परिणामकरक ठरू शकते? हे पाहणे महत्वाचे ठरेल. जेथे पर्याय नाही, तिथे Starlink हे खरोखरच एक आधुनिक वरदान ठरू शकते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली