ताज्या बातम्या

Tesla Cyber Truck : देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये, रस्त्यांवर टेस्ला गाडी पाहून लोक आश्चर्यचकित

इलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाची सायबर ट्रक गुजरात येथील सुरतमधील प्रसिद्ध व्यापारी लवजी डालिया यांनी ऑर्डर दिली आहे.

Published by : Prachi Nate

इलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाची सायबर ट्रक गुजरातमधील सुरतमध्ये पोहोचली आहे. सुरतमधील प्रसिद्ध हिरे व्यापाऱ्यानं याची ऑर्डर दिल्याची माहिती समोर आलीये. प्रसिद्ध व्यापारी लवजी बादशाह यांनी याची ऑर्डर दिल्याची माहिती समोर आली आहे. हिरे व्यापारी आणि कारप्रेमी लवजी यांनी त्यावर आपल्या घराचं 'गोपिन' हे नाव देखील लिहिलं आहे.

सायबर ट्रकची मूळ किंमत $70,000 किंवा अंदाजे 60 लाख रुपये आहे. सुरतच्या रस्त्यांवर टेस्ला सायबरट्रक पाहून लोक आश्चर्यचकित झालेत. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, गुरुवारपासून, दलिया कुटुंबातील नातेवाईक आणि ओळखीचे लोक त्यांच्या मुलांसह मोठ्या संख्येने त्यांच्या घरी आणि कार्यालयात गाडी पाहण्यासाठी येऊ लागले आहेत.

डालियाचा मोठा मुलगा पीयूष माध्यमांशी बोलताना म्हणाला की, "आम्ही ऑनलाइन माहिती तपासली होती त्यानुसार, भारतात अशी कोणतीही कार आयात केलेली नाही. आम्ही सहा महिन्यांपूर्वी अमेरिकेतील टेक्सास येथील टेस्ला शोरूममध्ये ही कार बुक केली होती. सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आम्हाला काही दिवसांपूर्वी डिलिव्हरी मिळाली. त्यामुळे आम्ही कार दुबईला आणली आणि तिथे रोड रजिस्ट्रेशन झाले. ही कार समुद्री मार्गाने भारतात पोहोचवण्यात आली. "

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा