Elon Musk 
ताज्या बातम्या

Elon Musk: न्यूरालिंक ब्रेन चिपचे तिसऱ्या रुग्णामध्ये प्रत्यारोपण

इलॉन मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीच्या ब्रेन चिप तिसऱ्या रुग्णामध्ये प्रत्यारोपित करण्यात आली आहे. पुढील वर्षी आणखी २० ते ३० रोपणांची योजना असल्याची माहिती इलॉन मस्क यांनी दिली आहे.

Published by : Gayatri Pisekar

अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांचा महत्तकांक्षी प्रकल्प न्यूरालिंक कंपनीने आपल्या ब्रेन कंप्यूटर इंटरफेस (BCI) उपकरणाचे तिसऱ्या रुग्णामध्ये यशस्वी प्रत्यारोपण केले आहे. मस्क यांनी २०२५ मध्ये आणखी २० ते ३० रुग्णांना हे उपकरण प्रत्यारोपित करण्याची योजना असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

मस्क यांनी लास वेगासमधील एका कार्यक्रमात सांगितले, "आतापर्यंत तिघांवर न्यूरालिंकच्या ब्रेन चिपचे प्रत्यारोपण करण्यात आलं आहे, आणि ते सुरळित काम करत आहे." हा कार्यक्रम त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर थेट प्रसारित करण्यात आला होता.

काय आहे न्यूरालिंक ब्रेनचीप प्रॉजेक्ट?

न्यूरालिंक हे ब्रेन चिप स्टार्टअप आहे. ज्याची स्थापना मस्कने 2016 मध्ये केली होती. नाण्याच्या आकाराचे एक यंत्र कवटीत शस्त्रक्रियेने रोपण केले जाते. अति-पातळ वायर्स मेंदूमध्ये जातात आणि ब्रेन कंप्युटर इंटरफेस (BCI) विकसित करतात, सामान्य ब्लूटूथ कनेक्शनद्वारे ते स्मार्ट डिव्हाईसला जोडता येतं. मस्क म्हणाले, टेलिपॅथी नावाच्या त्यांच्या डिव्हाईसने, लोकांना त्यांचे फोन किंवा संगणक फक्त विचार करून नियंत्रित करता येऊ शकते.

कोणासाठी उपयुक्त?

मोटर फंक्शन नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या भागात चिप लावल्याने लोकांना न्यूरोलॉजिकल विकारांवर मात करता येईल, असा कंपनीचा दावा आहे. मस्क म्हणाले की सुरुवातीचे वापरकर्ते ते असतील ज्यांनी त्यांच्या अंगांचा वापर करताना मर्यादा येतात.

न्यूरालिंक, मेंदूतील इलेक्ट्रोड्स वापरून संगणकांशी संवाद साधण्याचा उद्देश असलेल्या उपकरणांच्या विकसनासाठी प्रसिद्ध आहे. कंपनीचे डिव्हाइस अर्धांगवायू, ALS (अ‍ॅम्योट्रोफिक लेटरल स्क्लेरोसिस) आणि इतर न्यूरोलॉजिकल परिस्थितींवर उपचार करण्यात मदत करू शकते. हे उपकरण मेंदूच्या ऊतीमध्ये इलेक्ट्रोड्स ठेवण्यासाठी एका विशेष शस्त्रक्रियेची आवश्यकता असते.

एका वर्षापूर्वी, न्यूरालिंकने आपले पहिले यशस्वी प्रत्यारोपण नोलँड अर्बाग नावाच्या रुग्णाला केले होते, ज्याने ब्रेन- कंप्यूटर इंटरफेसद्वारे संगणक नियंत्रित करण्याची क्षमता मिळवली होती. कंपनीने सध्या अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) मंजुरीसाठी दोन अभ्यास सुरु केले आहेत. "प्राइम स्टडी" हे अर्धांगवायूग्रस्त पाच रुग्णांसाठी डिझाइन केले गेले आहे. ज्यात रुग्णांना त्यांच्या विचारांद्वारे संगणक किंवा स्मार्टफोन सारख्या बाह्य उपकरणांचा वापर करण्याची क्षमता मिळेल. दुसरे अभ्यास, "कॉन्व्हॉय," तीन रुग्णांसाठी आहे आणि यामध्ये रुग्णांना सहाय्यक रोबोटिक उपकरणांचा वापर करण्याची परवानगी दिली जाईल.

न्यूरालिंकची उद्दिष्टे फक्त न्यूरोलॉजिकल रोगांवर उपचार करणेच नाही तर मेंदू आणि मशीन दरम्यानचे सीमारेषा पार करण्याचे देखील आहेत. 2025 मध्ये सुरू होणाऱ्या आणखी चाचण्यांमुळे कंपनीचे भवितव्य अधिक व्यापक प्रमाणावर बदलू शकते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test