मुंबई एलफिन्स्टन पूल १५ एप्रिलपासून म्हणजेच आजपासून बंद होणार होता. मात्र अद्यापही हा पूल वाहतूकीसाठी सुरु आहे. पुलाच्या पुर्नबांधणीकरिता पूल बंद करण्यात येणार आहे.
वरळी- शिवडी जोडणारा एलफिन्स्टन पूल हा बंद करण्यात येणार आहे. हा पूल 2 वर्षे बंद ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे. जुना ब्रिज तोडून आता त्या ठिकाणी डबल डेकर ब्रिजची निर्मिती एमएमआरडीएच्या माध्यामांतून होणार आहे. यामुळे मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. प्रभादेवी रेल्वे स्थानकातील पूल बंद केल्यानंतर सायन, मांटुग्याकडून येणारी आणि वरळी लोअर परेल, महालक्ष्मीकडे जाणारी वाहतूक दादरच्या टिळक पुलावरुन वळवली जाणार आहे. त्यामुळे दादर पश्चिमेला मोठी वाहतूककोंडी होण्याची चिन्हे आहेत. अटल सेतूला थेट वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेसाठी हा पूल पाडण्यात येणार आहे.
वाहतूक पोलिसांनी सूचवलेले वाहतूकीतले बदल
- वाहने मडके बुवा चौक पासून उजवीकडे वळतील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने जातील . त्याचप्रमाणे खोडादाद सर्कल पासून डावीकडे टिळक ब्रिजमार्ग इच्छित स्थळी वाहनांना पोहचता येईल
-वाहने मडके बुवा चौकापासून (परळ टी.टी. जंक्शन) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडमार्गे थेट कृष्णा नगर जंक्शन, परळ वर्कशॉप, सुपारी बाग जंक्शन आणि भारत माता जंक्शन मार्गे पुढे जातील. तेथून, महादेव पालव रोडवर उजवीकडे वळून करी रोड रेल्वे ब्रिज ओलांडून आणि नंतर शिंगटे मास्टर चौकातून उजवीकडे वळून लोअर परळ ब्रिजवर पोहोचतील.
-दादर टीटी जंक्शन पासून वाहने उजवीकडे वळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड मार्गे टिळक ब्रिजकडे जातील.
-वाहने संत रोहिदास चौक (एल्फिन्स्टन जंक्शन) पासून सरळ जातील, वडाचा नाका जंक्शन येथे डावीकडे वळतील. शिंगटे मास्टर चौक येथे पोहोचण्यासाठी याच मार्गाने वाहने लोअर परेल ब्रिजमार्गे पुढे जातील. त्यानंतर, वाहने महादेव पालव रोडवर डावीकडे वळतील आणि करी रोड रेल्वे ब्रिजमार्गे भारतमाता जंक्शनकडे जातील.
-महादेव पालव रोड (करी रोड रेल्वे ब्रिज) हा कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारत माता जंक्शन) पासून शिंगटे मास्टर चौकापर्यंत सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि विरुद्ध दिशेने दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत एक दिशा वाहतूक खुली राहील. दोन्ही दिशा रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुल्या राहतील.