थोडक्यात
लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील स्फोट प्रकरण
13 नोव्हेंबरपर्यंत लाल किल्ल्यावरील प्रवेश बंद
स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
(Delhi Red Fort ) नवी दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळ पार्किंगमध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर अनेक गाड्यांना आग लागली. हा स्फोट एवढा मोठा होता की, आजूबाजूच्या दुकानांच्या काचाही फुटल्या. या स्फोटात सुमारे 8 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. लाल किल्ला परिसरात मेट्रोच्या गेट क्रमांक एकवर एक कार उभी होती. याच कारमध्ये हा स्फोट झालेला आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या तीन गाड्यांना आग लागल्याची घटना घडली. हा स्फोट नेमका कसा झाला? याचा तपास आता घेतला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर आता ठिकठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्ली लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण स्फोटामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आहे. या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर 13 नोव्हेंबरपर्यंत पर्यटकांसाठी लाल किल्ल्यावरील प्रवेश बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 13 नोव्हेंबरपर्यंत लाल किल्ल्यावरील प्रवेश बंद राहणार आहे.