Vanchit Bahujan Aaghadi : 'परवानगी नाकारली तरी मोर्चा निघणारच', वंचित बहुजन आघाडीचा पोलिसांना इशारा Vanchit Bahujan Aaghadi : 'परवानगी नाकारली तरी मोर्चा निघणारच', वंचित बहुजन आघाडीचा पोलिसांना इशारा
ताज्या बातम्या

Vanchit Bahujan Aaghadi : 'परवानगी नाकारली तरी मोर्चा निघणारच', वंचित बहुजन आघाडीचा पोलिसांना इशारा

छत्रपती संभाजीनगरात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी राहुल मकासरे यांच्यावर दाखल गुन्ह्याच्या निषेधार्थ संघ कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

  • संघाच्या कार्यालयावरील वंचितच्या मोर्चाची परवानगी नाकारली….

  • 'कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणारच'..

  • वंचित बहुजन आघाडी मोर्चावर ठाम....

  • वंचितच्या पदाधिकाऱ्याविरोधात दाखल गुन्ह्याविरोधात मोर्चाचे आयोजन...

छत्रपती संभाजीनगरात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी राहुल मकासरे यांच्यावर दाखल गुन्ह्याच्या निषेधार्थ संघ कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, या मोर्चामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, या कारणाने पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी परवानगी नाकारली तरी मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला असून, त्याबाबत पोलिसांना पत्र दिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्य नोंदणीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर राहुल मकासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

(पोलिसांचे परवानगी नाकारण्याचे पत्र आणि वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना दिलेले पत्र उपलब्ध.)

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा