ताज्या बातम्या

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या 30 जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या

Published by : Siddhi Naringrekar

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या 30 जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाकडून विविध अभ्यासक्रमाच्या एकूण 30 परीक्षा या 30 जानेवारी 2023 रोजी घेण्यात येणार होत्या.

विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे की, विधि (Law), अभियांत्रिकी (Engineering), विज्ञान शाखेचे (M.Sc) चौथे सत्र, वाणिज्य (Commerce) आणि अन्य संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश होता. तर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीमुळे मानवता विषयाच्या पदव्युत्तर पदवी (MA- Sem II, Sem IV) सत्र तिसरे आणि चौथे, विधि अभ्यासक्रमाचे (Law : LLM : Sem III, BBA -LLB Sem III) सत्र तिसरे, अभियांत्रिकी (Engineering : SE Sem III) अभ्यासक्रमाचे सत्र तिसरे, विज्ञान शाखेच्या (Science : M.Sc Sem IV, M.Sc Part II) एमएससी सत्र चौथे, एम एससी भाग दोन, वाणिज्य (Commerce: M.Com Part II) शाखेच्या, एमकॉम भाग दोन या परीक्षा महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचे मतदान 30 जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे रोजी मुंबई विद्यापीठाने नियोजित केलेल्या या परीक्षा आता 7 फेब्रुवारी 2023 रोजी होतील.

बारामतीत EVM मशीन ठेवलेल्या गोडाऊनमधील CCTV बंद; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Dhananjay Munde : ऐतिहासिक मतांनी पंकजाताई निवडून येतील, असा विश्वास मला आहे

Heena Gavit : हिना गावित यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाल्या...

Ravindra Dhangekar : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर रविंद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Dilip Walse Patil : नागरिकांनी सजग राहून मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे