ताज्या बातम्या

Pune : पुणे शहरातील 61 रस्त्यांवर खोदकाम; वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता

पुणे खोदकाम: शहरातील 61 रस्त्यांवर काम, वाहतूक कोंडीची शक्यता. पुणेकरांनी संयम बाळगावा, प्रशासनाला सहकार्य करावे. पुण्यातील रस्त्यांवर खोदकाम; पुणेकरांना होणार वाहतूक कोंडी त्रास

Published by : Prachi Nate

शहरातील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांनी आणि वाहतूक पोलिसांनी मिळून सुमारे 61 रस्त्यांवर खोदकाम करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे आधीच गर्दीच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या पुणेकरांना काही काळासाठी अधिक त्रास सहन करावा लागू शकतो.

कोथरूड, वारजे, येरवडा, बाणेर, हडपसर, बालेवाडी, बीटी कवडे रोड, कोंढवा, बिबवेवाडी, धानोरी, शिवाजीनगर आणि सारसबाग परिसरात या कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या भागांमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महानगरपालिकेच्या मलनिःसरण व जलपुरवठा विभागांसह पोलिसांच्या महत्त्वाच्या सीसीटीव्ही प्रकल्पासाठी ही कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, वाहतूक पोलिसांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की, ही सर्व कामे 31 मे 2025 पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक असेल.

पोलिसांनी महापालिकेकडून कामाच्या स्वरूपाची मागणी केली असून, कोणत्या भागात किती कालावधीसाठी काम सुरू राहील, याची माहिती प्रशासनाकडून मागवली आहे. नियोजनानुसार कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी विशेष लक्ष दिले जाणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे. पुणेकरांनी निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : सण उत्सवासाठी राज्यात 'एक मंडळ एक पोलीस अंमलदार'

Latest Marathi News Update live : मराठा आरक्षणासंदर्भात मोठा बातमी, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या काळात समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य