ताज्या बातम्या

Nimisha Priya : येमेनमध्ये असणाऱ्या केरळच्या नर्स निमिषा प्रियाच्या फाशीला तूर्तास स्थगिती ; कुटुंबाला दिलासा

निमिषा प्रियाच्या फाशीला तूर्तास स्थगिती; कुटुंबीयांना दिलासा

Published by : Team Lokshahi

येमेनच्या कारागृहात असलेली केरळची नर्स निमिषा प्रिया हिला बिझनेस पार्टनर तलाल अब्दो महदीच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली होती त्याला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. 16 जुलैला ही फाशी देण्यात येणार होती मात्र हा निर्णय येमेनच्या अधिकाऱ्यांनी बदलला असल्यामुळे भारतातील तिच्या आईला, तिच्या नवऱ्याला आणि इतर नातेवाईकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

येमेनमध्ये असलेली केरळची नर्स निमिषा प्रिया हिची फाशीची शिक्षा सध्या थांबवण्यात आली आहे. निमिषाचे कुटुंब आणि तलाल अब्द महदीच्या कुटुंबामध्ये ब्लडमनी बद्दल कोणतेही फायनल डिसिजन झाले नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 2017 साली निमिषावर तिचा बिझनेस पार्टनर तलाल अब्दो महदीच्या हत्येचा आरोप करण्यात आला होता. निमिषाच्या म्हणण्यानुसार तलालने तिचा पासपोर्ट जप्त केला,

तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला आणि 2015 मध्ये येमेनमध्ये स्थापन केलेल्या क्लिनिकची कमाई हडप केली. यामुळे स्वसंरक्षणार्थ आणि तिचे कागदपत्रे परत मिळवण्यासाठी निमिषाने तलालला बेशुद्धीचे इंजेक्शन दिले, परंतु ओव्हरडोजमुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तिने तलालच्या मृतदेहाचे तुकडे करून पाण्याच्या टाकीत लपवले. याप्रकरणी . निमिषाला यमन-सौदी सीमेवर अटक करण्यात आली आणि 2018 मध्ये यमेनी न्यायालयाने तिला फाशीची शिक्षा सुनावली. यानुसार तिला 16 जुलै 2025 ला फाशी देण्यात येणार होती. मात्र यमनमध्ये शरिया कायद्यानुसार 'दियाह' किंवा ब्लड मनीची तरतूद आहे, ज्याद्वारे पीडित कुटुंब दोषीला माफ करू शकते. यानुसार निमिषाच्या कुटुंबीयांनी तलालच्या कुटुंबियांसमवेत चर्चा करण्यास सुरुवात केली. सध्या 'सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल ॲक्शन कौन्सिल' ब्लड मनीसाठी निधी गोळा करण्यात आणि चर्चेत सक्रिय सहभाग दर्शवत आहे.

भारताचे प्रमुख धार्मिक नेते आणि केरळचे कंथापुरम एपीचे ग्रँड मुफ्ती अबूबकर मुसलियार यांनीही या प्रकरणात थेट हस्तक्षेप केला. निमिषाचे कुटुंब आणि समर्थकांनी तलालच्या कुटुंबाला 10 लाख अमेरिकन डॉलर (सुमारे 8.5 कोटी रुपये) देण्याची ऑफर दिली आहे, परंतु अद्याप यावर कोणतीही सहमती झालेली नाही. ब्लड मनीद्वारे माफी हाच निमिषाला वाचवण्याचा शेवटचा मार्ग आहे. जर तलालचे कुटुंब माफी देण्यास तयार झाले, तरच फाशीची शिक्षा टाळता येऊ शकते.दोन्ही कुटुंबामध्ये पहिली चर्चा सकारात्मक झाली असल्या कारणाने ही फाशीची शिक्षा तूर्तास टाळली गेली आहे. मात्र असे असले तरी मृत तलाल अब्दो महदी यांच्या कुटुंबीयांनी अद्याप निमिषाला माफी देण्यास किंवा ब्लड मनी स्वीकारण्यास पूर्णपणे सहमती दर्शवलेली नाही त्यामुळे तिचे प्राण वाचण्याची आशा अजूनही अधांतरीच आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आज सकाळी 10 वाजता मराठा आरक्षण उपसमितीची बैठक

Manoj Jarange Maratha Protest : मराठा आंदोलनात आणखी एका मराठा बांधवाचा गेला जीव; जरांगेंसह सर्व आंदोलकांमध्ये शोककळा आणि संतापाची लाट

Israel Air Strike On Yemen : येमेनमध्ये इस्रायलच्या एअर स्ट्राइकचे थैमान; अनेक मंत्र्यांसह हौथी सरकारचे पंतप्रधान ठार

Latest Marathi News Update live : अमित शहांचा ताफा लालबागच्या राज्याच्या दर्शनाला