ताज्या बातम्या

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो वनच्या वेळेत वाढ; पाहा पहिली आणि शेवटची मेट्रो कधी सुटणार?

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो वनने निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी फेऱ्यांच्या वेळेत बदल केले आहेत. पहिली फेरी पहाटे 4 वाजता व शेवटची फेरी मध्यरात्री 1 वाजता सुटणार आहे.

Published by : shweta walge

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबर रोजी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबई मेट्रो प्रशासनाने निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणाऱ्या मुंबई मेट्रो वनने आपल्या फेऱ्यांच्या वेळात बदल केला आहे. पालिका आणि इतर निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रोच्या फेऱ्या पहाटे लवकर सुरु होऊन मध्यरात्री उशीरापर्यंत चालू राहणार आहेत. यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी आणि आपले कार्य पूर्ण करण्यासाठी सोयीस्कर प्रवास उपलब्ध होईल.

20 नोव्हेंबर रोजी वर्सोवा ते घाटकोपर मुंबई वन मेट्रोची पहिली फेरी पहाटे 4 वाजता सुटेल. आणि शेवटची फेरी दोन्ही स्थानकावरुन ( 21 नोव्हेंबर रोजी ) मध्यरात्री 1 वाजता सुटणार आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना सकाळी लवकर इलेक्शन ड्यूटीसाठी वेळेत पोहचण्यासाठी ड्युटीसाठी मेट्रो वनच्या फेऱ्या सकाळी लवकर आणि रात्री उशीरा सोडण्यात येणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा