Sheryl Sandberg team lokshahi
ताज्या बातम्या

Facebook COO : फेसबुकच्या सीओओ शेरिल सॅंडबर्ग यांचा राजीनामा

Published by : Shweta Chavan-Zagade

फेसबुकची (Facebook) मुळ कंपनी मेटाच्या सीओओ (META COO) शेरिल सॅंडबर्ग (Sheryl Sandberg) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. शेरिल गेल्या 14 वर्षांपासून मेटा कंपनीच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान, शेरिल सॅंडबर्ग यांनी राजीनामा का, दिला याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. मात्र त्यांनी सोशल मीडियावर राजीनामा देणार असून पुढचे त्यांचे प्लॅन्स काय असणार याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर फेसबुकचे सीईओ (Facebook CEO) मार्क झुकरबर्ग यांनीही एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

मार्क झुकरबर्गने (Mark Zuckerberg) आपल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “शेरिल सॅंडबर्ग फेसबुकसोबत कायम राहतील. शेरिल या फेसबुकच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा हिस्सा असतील. तसेच शेरिल यांच्यानंतर फेसबुकचा सीओओ कोण असेल याची सर्वांनाच उत्सुकता होती. शेरिल यांच्यानंतर फेसबुकच्या सीओओचा पदभार जेवियर ओलिवन यांच्यावर सोपवण्यात आला आहे”, असे मार्क झुकरबर्गने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

शेरिल यांची सोशल मीडियावरील पोस्ट

फेसबुकच्या सीओओ शेरिल सँडबर्ग यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले की, “आपण कोणतेही उत्पादन बनवतो, त्यांचा लोकांवर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे लोकांच्या गोपनीयतेचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी असते. 2008 मध्ये जेव्हा मी कंपनीत रुजू झाले होते, त्यावेळी मला वाटलं होतं की, पुढची पाच एक वर्ष इथे राहीन, पण बघता बघता तब्बल 14 वर्ष उलटून गेली. आता आयुष्याचा नवा अध्याय लिहिण्याची वेळ आली आहे.”, असेही त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?