राज्यात महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. 15 जानेवारीला 2026 रोजी राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणूक(Managarpalika Election) होणार असून निकाल 16 जानेवारीला लागणार आहे. त्यानंतर आता राज्यातील राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यात पुणे महानगर पलिकेसाठीचं महायुतीचं चित्र स्पष्ट झालं आहे. कारण या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप समोरासमोर लढणार आहेत.
पुण्यात, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी मैत्रीपूर्ण लढती होणार…
निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीबाबत मोठी माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार नाही. लढत झाली तरी मैत्रीपूर्ण असेल. असं सांगत संभ्रम दूर केला आहे. त्यामुळे आता भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने येणार आहे.
शिवसेनेबरोबर भाजपची युती
भाजपने मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेबरोबर युती केली आहे. तर अजितदादांना युतीपासून दूर केले आहेत.दुसऱ्यांना स्पेस द्यायची नाही म्हणून दोन्ही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. पुढे ते म्हणाले की, आणि राष्ट्रवादी हे दोन्ही मोठे पक्ष आहेत. माझं अजित पवारांसोबत बोलणं झाले आहे त्यामुळे मी आज तुम्हाला स्पष्ट सांगतो पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी समोरासमोर लढेल मात्र ही लढाई मैत्रीपूर्ण असेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. महिनाभरापूर्वीच जिल्हा निहाय निवडणूक प्रभारी आणि निवडणूक प्रमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज संस्था जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तिची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली आहे. यात संपूर्ण पुणे जिल्ह्याची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आली आहे.
यामध्ये भाजपची रणनीती पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा परिषद या ठिकाणी आखण्याचे काम मोहोळ यांना करावे लागणार आहे. या पुणे जिल्ह्यातच त्यांचा सामना हा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या सोबत होणार आहे. पुणे जिल्ह्याचे प्रभारी नेमून मोहोळ यांनाभाजपने नेता म्हणून पुढे येण्यासाठी मोठी संधी दिल्याचे मानले जात आहे. अजित पवार यांच्याशी त्यांचा हा थेट दुसरा सामना असणार आहे.