थोडक्यात
आगामी निवडणुकांसाठी फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा पर्याय निवडा
महायुती की स्वबळावर याचा निर्णय मात्र गुलदस्त्यातच
आगामी निवडणुकांसाठी फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आले आहे. कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा पर्याय निवडा नाहीतर मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिले आहेत. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची आढावा बैठक झाली. यावेळी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी आढावा सादर केला. महायुती की स्वबळावर याचा निर्णय मात्र गुलदस्त्यातच राहिला.
या बैठकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. गेल्या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्र पक्षाला चांगले यश मिळाले होते. यंदाच्या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होईल असा दावा त्यांनी केला. आगामी निवडणुकांबाबत भाजप कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. निवडणुकीत स्थानिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतला जाईल. सध्या तरी जिथे जिथे शक्य असेल तिथे युती पुण्यावर भर दिला जाईल. ती झाली नाही तर मैत्रीपूर्ण लढती कराव्या लागतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.