ताज्या बातम्या

हापूसच्या नावाखाली फसवणूक! बाजारात केमिकलयुक्त बनावट आंब्यांची सर्रास विक्री सुरू

अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर शहरात आंबे आणि आमरस विक्री मोठ्या प्रमाणात होता आहे. त्यामुळे बाजारात आंब्यांची मागणी वाढली आहे.

Published by : Team Lokshahi

छत्रपती संभाजीनगर

अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर शहरात आंबे आणि आमरस विक्री मोठ्या प्रमाणात होता आहे. त्यामुळे बाजारात आंब्यांची मागणी वाढली आहे. हीच संधी साधून अनेक व्यापाऱ्यांनी राज्याबाहेरून आणलेले केमिकलयुक्त, बनावट आंबे 'हापूस'च्या नावाखाली विक्रीसाठी बाजारात आणले आहेत. परिणामी, शहरवासीयांची फसवणूक तर होतेच आहे, शिवाय त्यांचे आरोग्यही धोक्यात येत आहे.

नैसर्गिक आणि रसायनयुक्त आंब्यामध्ये फरक ओळखणं गरजेचं

नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्याला किमान 8 दिवस लागतात. असे आंबे दिसायला कदाचित सुंदर नसतील, पण त्यांचा सुगंध खूप मोहक आणि चव अप्रतिम असते. दुसरीकडे, कॅल्शियम कार्बाइडसारख्या रसायनांच्या साहाय्याने अवघ्या 24 तासांत पिकवलेले आंबे वरून पिवळसर आणि आकर्षक दिसतात, पण आतून कच्चे असतात. त्यांना लसणासारखा उग्र वास येतो आणि हातात घेतल्यावर उष्णता जाणवते. शिवाय, अशा आंब्यांना हात लावल्यास पावडरही लागते.

‘हापूस’च्या नावाखाली इतर आंब्यांची विक्री

शहरातील चिकलठाणा, क्रांती चौक, सिडको, जळगाव रोड, औरंगपुरा, बीड बायपास अशा प्रमुख भागांमध्ये असंख्य आंबा विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. ‘ओरिजिनल हापूस मिळेल’ असे बोर्ड लावलेले असले तरी, प्रत्यक्षात देवगड किंवा रत्नागिरीचा हापूस नसून, चेन्नई, केरळ, बंगळुरू आदी राज्यांतून आणलेले इतर प्रकारचे आंबे ‘हापूस’ म्हणून विकले जात आहेत.

ग्राहकांची दिशाभूल, प्रशासनाचे दुर्लक्ष

विक्रेते कोणत्या शेतकऱ्याकडून आंबा आणतात, याबद्दल माहिती देऊ शकत नाहीत. ‘व्यापाऱ्याकडून घेतला’ असे उत्तर दिले जाते. यातून ग्राहकांची फसवणूक होतेय, आणि प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. ग्राहकांची दिशाभूल करून त्यांच्या खिशाला चाट लावण्याचा प्रकार शहरभर सर्रास सुरु आहे.

खऱ्या देवगड हापूसला QR कोड

खऱ्या देवगड किंवा रत्नागिरी हापूस आंब्याला आता QR कोड दिला जातो. तो स्कॅन केल्यावर आंबा उत्पादकाचे नाव, गाव व इतर माहिती समजते. मात्र शहरातील बाजारपेठेत असा कोणताही QR कोड दिसून आलेला नाही, हे विशेष.

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

1. आंबा विक्रेत्याकडे उत्पादक शेतकऱ्याची माहिती मागा.

2. शक्य असल्यास QR कोड असलेले आंबे खरेदी करा.

3. आंबा हातात घेतल्यावर गरम जाणवत असेल किंवा उग्र वास येत असेल, तर खरेदी टाळा.

4. शक्यतो स्थानिक, परिचित विक्रेत्यांकडून आंबा खरेदी करा.

5. नैसर्गिक पिकवलेल्या आंब्यांची त्वचा थोडी सुरकुतलेली असते आणि गंध मोहक असतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?