जम्मू- काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेले दिलीप जयराम देसले यांचे पार्थिव आणण्यासाठी कुटुंबीय रवाना झाले आहेत. कुटुंबीयांनी पार्थिव ताब्यात घेऊन त्यांच्यावरती त्याच्या राहत्या घरी अंत्यसंस्कार होत आहेत.
कोण होते दिलीप डिसले?
दिलीप जयराम देसले हे मूळचे मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील रहिवासी होते. नोकरीनिमित्त 35 वर्षांपासून त्यांचे पनवेलमध्ये वास्तव होते. काही दिवसांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले. उन्हाळ्याच्या दिवसात पनवेलमधील काही मंत्रिमंडळींनी सोबत जम्मू- काश्मीरला पर्यटनासाठी जाण्याचा बेत आखला. 22 एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवाद्यांनी बेछूत गोळीबार केला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी आणि अन्य मंत्रिमंडळी या हल्ल्यात वाचले.