ताज्या बातम्या

प्रसिद्ध उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचे निधन

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मोटार वाहन उद्योगातील प्रसिद्ध उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचे निधन झाले आहे. ते 64 वर्षांचे होते. ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. टोयोटा इंडियाने याबद्दल एक प्रसिद्ध पत्रक जारी केले करत ही माहिती दिली आहे.

पत्रकानुसार, 29 नोव्हेंबर 2022 ला टोयोटा किर्लोस्कर मोटरचे व्हॉइस चेयरमन विक्रम एस किर्लोस्कर यांचं दु:खद निधन झाले. या दुखाच्या प्रसंगात आम्ही सगळे त्यांच्या कुटुंबियासोबत असून त्यांच्या आत्मास शांती लाभो, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे. आज दुपारी 1 वाजता बंगळुरुमधील हेब्बल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी गितांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विक्रम किर्लोस्कर यांनी श्रध्दांजली वाहिली आहे. वाहन उद्योगातील यशस्वी उद्योजक, टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे निधन झाले. भारतात उत्तम दर्जाच्या कार उत्पादक म्हणून त्यांच्या उद्योगसमूहाकडे पाहिले जात होते. त्यांच्या निधनामुळे सामाजिक भान असणारा एक यशस्वी उद्योजक काळाच्या पडद्याआड गेला. किर्लोस्कर कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली, अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्याचे श्रेय विक्रम किर्लोस्कर यांना जाते. विक्रम किर्लोस्कर यांनी एमआयटीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. त्यांनी CII, SIAM तसेच ARAI मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.

Beed: बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त

Eknath Shinde On Wadettiwar: वड्डेटीवाराचं डोकं फिरलं आहे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टीका

Shantigiri Maharaj: नाशिक लोकसभेतून माघारीचा अखेरचा दिवस, शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम

Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद? घाटकोपरमधील गुजराती बहुल सोसायटीतील प्रकार

दिंडोरी लोकसभेतून अखेर जे पी गावित यांची माघार; म्हणाले...