ताज्या बातम्या

मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही लावणार उपस्थिती

आज पंतप्रधान मोदींकडून दिल्लीतील हॉटेल अशोका येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना फेअरवेल डिनर दिलं जाणार आहे. यावेळी अनेक मंत्री, काही मुख्यमंत्री यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

आज पंतप्रधान मोदींकडून दिल्लीतील हॉटेल अशोका येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना फेअरवेल डिनर दिलं जाणार आहे. यावेळी अनेक मंत्री, काही मुख्यमंत्री यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही फेअरवेल डिनरला उपस्थिती लावणार आहेत. आज दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहेत.

स्नेहभोजनाच्या निमित्ताने शिंदे-फडणवीस दिल्लीत जात असले तरी राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत या भेटीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी किंवा सोमवारी असल्याची चर्चा आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा ३० जून रोजी शपथविधी झाला. शपथविधी होऊन आता २२ दिवस उलटले आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही.

स्नेहभोजन समारंभ सायंकाळी ७ ते १० या वेळेत होणार आहे. त्यानंतर शिंदे-फडणवीस भाजप श्रेष्ठींशी मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपाबाबत चर्चा करणार असल्याचे समजते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी