ताज्या बातम्या

Ravikant Tupkar Accident : शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीचा भीषण अपघात; कुटुंबीय आणि तुपकर सुखरूप

अपघात बातमी: शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला ट्रकची धडक, सर्वजण सुरक्षित.

Published by : Riddhi Vanne

कर्जमुक्तीच्या मागणीवर राज्यभरात आंदोलन करणारे शेतकरी नेते रविकांत तुपेकर यांच्या गाडीचा रात्री 12.30 सुमारास अपघात झाला. धाराशिव येथील वाशी तालुक्यातील पारगाव टोलनाक्यावर लातूरकडून जालनाकडे जाताना अपघात झाला. ट्रक ड्रायव्हर मद्यधुंद असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रविकांत तुपेकर यांच्या गाडीला मागून धडक दिली. सुदैवाने या भीषण अपघातमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. रविकांत तुपेकर यांच्या गाडीमध्ये बसलेल्या पीए कार्तिक सवडतकर व राजाराम जाधव यांना सौम्य मार लागला आहे. तसेच चालक अजय मालगे व तुपकरांचे सहकारी गजानन नाईकवाडे यांना कोणतीही दुखापत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचा चालक हा दारूच्या नशेत होता, अपघातानंतर चौकशी केली असता, चालक खोटे बोलत होता, माहिती लपवण्याचा प्रयत्न त्याचा चालू होता. पोलिसांनी ट्रकमधील किनरला ताब्यात घेतले आहे. साखरेने भरलेला ट्रक जप्त केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा