ताज्या बातम्या

Farmer ID Holders : केंद्रीय कृषी मंत्रालयाची शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! 'ही' सरकारची सुविधा मिळणार मोफत

केंद्रीय कृषी मंत्रालयाने देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पावसाचा अचूक अंदाज लावणे शक्य होणार आहे.

Published by : Rashmi Mane

केंद्रीय कृषी मंत्रालयाने देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पावसाचा अचूक अंदाज लावणे शक्य होणार आहे. देशभरातील शेतकऱ्यांना त्यांच्या फार्मर आयडी (Farmer ID) च्या आधार त्यांच्य क्षेत्रासाठी सुस्पष्ट हवामानाची माहिती थेट मोबाईलवर मिळणार आहे. बदलत्या हवामानामुळे शेतीतील संकटं वाढत चालली आहेत. पाऊस नेमका कधी पडेल? वादळ कधी येईल? याचा अंदाज नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

भारतात सध्या 6.5 कोटीहून अधिक शेतकऱ्यांचे 'Farmer ID' तयार करण्यात आले आहेत. या आयडीमध्ये शेतकऱ्यांच्या नावासोबत, जमिनीच्या नोंदी, शेतीचे क्षेत्र, पिकांची माहिती आणि आधार क्रमांकाचा समावेश असतो. सरकारकडे प्रत्येक शेतकऱ्याच्या शिवाराच्या नोंदी आहेत. याच आधारावर शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज मोबाईलवर SMS किंवा अ‍ॅपद्वारे पाठवण्यात येणार आहे.

ही मिळणार माहिती

फार्मर आयडीच्या लोकेशननुसार हवामानाची माहिती दिली जाईल.

पुढील आठवड्यात पाऊस किती पडेल?

तापमान किती असेल?

वारे, आर्द्रता कशी असेल? याचा अंदाज मिळेल.

ही माहिती रिअल टाइम अपडेट्ससह शेतकऱ्यांच्या भाषेत पाठवण्यात येईल.

यामुळे खते पेरणी, फवारणी, कापणी, सिंचन इ. कामांबाबत शेतकऱ्याला योग्य वेळ निवडता येईल.

हेही वाचा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम

B Sudarshan Reddy : माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर

Pune : पुण्यातील 'या' भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा; रेड अलर्ट जारी, वाहतुकीवर मोठा परिणाम