Admin
ताज्या बातम्या

शेतकऱ्यांची शिष्टमंडळासोबत होणारी बैठक पुढे ढकलली

शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईकडे मार्गस्थ झाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईकडे मार्गस्थ झाला आहे. लाल वादळ पुन्हा एकदा मुंबईला धडक देण्यासाठी सज्ज झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा आणि इतर समविचारी संघटना यांनी हा लाँग मार्च काढला आहे.

शेतमालाला मिळत नसलेले भाव, कांदा आणि अनेक अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. लाँगमार्च मध्ये कामगार, शेतकरी सर्व सहभागी होत आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी कांदा दरावरून रस्त्यावर कांदा फेकत आंदोलनही केले जात आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत काल झालेली बैठक निष्फळ ठरली काही मुद्दे निकाली नाही निघाले म्हणून हा मोर्चा मुंबईकडे कूच करतोय. मोर्चाच्या मागण्या जर मान्य झाल्या तर आम्ही हा मोर्चा स्थगित करणार असल्याचे मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी आमदार जे पी गावित यांनी सांगितलंय.

आज दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक होणार होती मात्र ती पुढे ढकलली आहे. उद्या (15 मार्चला) 3 वाजता बैठक होणार आहे. अशी माहिती केंद्रीय सहसचिव, अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी सांगितली आहे. आता पुन्हा एकदा शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Government Websites : सरकारी संकेतस्थळे आता मराठीत होणार

E Bike Taxi : राज्यात ई-बाईक टॅक्सी सुरू होणार; पहिल्या 1.5 किमीसाठी 15 रूपये भाडं

Latest Marathi News Update live : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Accident : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात अपघात